राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली आहे. एकवेळ समझोता योजनेंतर्गत ही यादी तयार करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत 1 लाख 69 हजार 820 पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या यादीची वाट पाहत होते. आता पहिली यादी जाहीर झाल्यानं पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिल्या यादीत 1.69 लाख शेतकरी
या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकवेळ समझोता या तत्त्वावर ही कर्जमाफी दिली जात आहे. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी आपलं नाव यादीत आहे की नाही, हे तपासावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दोन लाखांवरील कर्जासाठी अट
ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांना दोन लाखांवरील अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. म्हणजेच अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर उर्वरित दोन लाखांचं कर्ज माफ केलं जाणार आहे.
यादी कुठे पाहता येईल?
कर्जमाफीची ही यादी ग्रामपंचायत कार्यालयात आणि ग्रामीण बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी तिथे जाऊन आपलं नाव तपासू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया पुढे जाणार आहे.
Leave a Reply