वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील काही तासांत या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने देशातील बारा राज्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
बारा राज्यांत हाय अलर्ट
हवामान विभागाने इशारा दिलेल्या राज्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात केवळ मुसळधार पाऊसच पडणार नाही, तर ताशी ६० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो.
अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांत पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मात्र कोरडे आकाश
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास राज्यात आकाश पूर्णपणे कोरडे राहणार असून, कुठेही पावसाची शक्यता नाही. मात्र काही जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
Leave a Reply