भारतात बिअर पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. रोज कोट्यवधी लोक पार्टी तसेच इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने आवडीने बिअर पितात. मात्र काही बिअर प्यायला खूपच कडू असतात, त्यामुळे अनेकांना ती आवडत नाही. अशा लोकांसाठी एक गोड चवीची बिअर उपलब्ध आहे, जी तिच्या वेगळ्या चवीमुळे चर्चेत आहे.
मिलर बिअरची खासियत काय?
ही बिअर मूळची अमेरिकन असून तिचे नाव मिलर असे आहे. ही बिअर आपल्या हलक्या आणि स्मुथ चवीमुळे ओळखली जाते. प्रत्येक बिअरची चव कडूच असते असे नाही; या ब्रँडचे मद्य पिल्यास ते गोड लागते. या बिअरला हलका मॉल्ट फ्लेवर असतो आणि मद्याला मक्याचा गंध येतो. कॉर्न सिरपमुळे ही बिअर गोड लागते, म्हणूनच ती अनेकांच्या पसंतीस उतरते.
ही एक लाईट बिअर आहे. लोकांना मद्य पिताना आनंद यावा, नशा चढावी आणि मद्यप्राशनाचा आनंद लुटता यावा यासाठी ही बिअर तयार करण्यात आली आहे, असे सांगितले जाते. ज्यांना कडू चव असणारी बिअर आवडत नाही, त्यांच्यासाठी ही खास बिअर असल्याचे मानले जाते.
किंमत किती?
या बिअरची ६५० मिलीची बाटली २६० रुपयांना मिळते. गोड चव आणि परवडणारी किंमत यामुळे ही बिअर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
मद्यप्राशनाबाबत महत्त्वाची टीप
मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक आहे. मद्यामुळे यकृत खराब होते. मद्यप्राशनाची सवय लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Leave a Reply