कोणत्या कुटुंबात वाद होत नाहीत? सासू-सुनेमध्ये तर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत असतात. याच कारणामुळे घरातील वातावरणही खराब होते आणि दोघींच्या वादात पुरुष अडकतो. अशा वेळी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
चाणक्य सांगतात की, पतीने कधीच पत्नीच्या बोलण्यावरून लगेच निर्णय घेऊ नये. कुटुंबात शांतता आणि सलोखा टिकवायचा असेल आणि नातेसंबंध टिकवायचे असतील, तर काही गोष्टी न ऐकणेच उत्तम. त्यांच्या मते, काही निर्णय भावनिकतेने नव्हे, तर बुद्धिमत्तेने घेतले पाहिजेत. तरच कुटुंबात शांतता नांदू शकते.
वेगळे राहण्याचा निर्णय घाईने नको
चाणक्याच्या मते, जर पत्नी कुटुंबापासून वेगळे राहण्याचा आग्रह धरत असेल, तर पतीने त्याबाबत घाईघाईने निर्णय घेऊन वेगळे घर बांधू नये. त्याने आधी समस्या समजून घेऊन संवादातून ती सोडवण्याचा प्रयत्न करावा. जर असे करूनही प्रश्न आणि वाद सुटत नसतील, तरच वेगळं राहण्याचा निर्णय घ्यावा.
मालमत्ता आणि खर्चाबाबत सल्ला
चाणक्य म्हणतात की, जर पत्नीने पतीची मालमत्ता किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची मालमत्ता स्वतःच्या नावावर हस्तांतरित करण्याचा आग्रह धरला, तर पतीने त्याला कधीही संमती देऊ नये. अशा निर्णयामुळे अनेकदा नातेसंबंधात आणि कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात.
एवढंच नाही, तर जर पत्नी दुसऱ्या व्यक्तीला कोणासमोर अपमान करण्यास, इजा पोहोचवण्यास किंवा भांडण्यास सांगत असेल, तर पतीने कोणत्याही कारणास्तव याला संमती देऊ नये किंवा या बाबतीत तिचं समर्थन करू नये. कारण अशा कृतींचा दोघांच्याही नात्यावर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो.
आचार्य चाणक्य यांनी असा सल्लाही दिला आहे की, जर पत्नीने पतीला अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्यास सांगितलं, तर पतीने त्याला संमती देऊ नये. खर्च करण्याऐवजी, शक्य तितकी बचत करावी आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी आर्थिक संतुलन राखावे.
ही माहिती चाणक्य नीतीतील पारंपरिक सल्ल्यांवर आधारित आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply