शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं अत्यंत गरजेचं असतं. मात्र वयानुसार शरीराला नेमकं किती पाणी हवं असतं, हे अनेकांना माहीत नसतं. लहान बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी पाण्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. वयानुसार पाण्याचं योग्य प्रमाण जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
० ते ६ महिन्यांच्या बाळांसाठी पाणी
० ते ६ महिने वयोगटातील बाळांना आईच्या दुधातून किंवा फॉर्म्युला मिल्कमधून आवश्यक पाणी मिळतं. त्यामुळे त्यांना वेगळं पाणी देण्याची गरज नसते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळाला पाणी देऊ नये, असं सांगितलं जातं.
७ महिने ते ३ वर्षांच्या मुलांसाठी पाणी
सहा महिन्यांनंतर आईच्या दुधासोबत किंवा फॉर्म्युला मिल्कसोबत थोडं-थोडं पाणी देता येतं. ७ ते १२ महिने वयोगटातील बाळांना दिवसभरात साधारण ०.८ लिटर पाण्याची गरज असते. तर १ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांनी दिवसभरात साधारण १.३ लिटर पाणी घ्यावं. यामध्ये दूध, फळं आणि इतर पदार्थांमधून मिळणाऱ्या पाण्याचाही समावेश होतो. वय वाढतं तसं पाण्याची गरजही वाढत जाते, त्यामुळे मुलांच्या वयानुसार त्यांना योग्य प्रमाणात पाणी देणं आवश्यक आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply