दारू पिणं आरोग्यासाठी घातक असतं, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र दारूचा सर्वाधिक वाईट परिणाम शरीराच्या कोणत्या भागावर होतो, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर यकृत, म्हणजेच लिव्हर असं मिळतं. नियमितपणे दारू प्यायल्याने लिव्हर खराब होऊ शकतं, हे अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. त्यामुळे दारू पिणाऱ्या अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे दारू प्यायला सुरुवात केल्यानंतर नेमक्या किती वर्षांनी लिव्हर खराब होतं?
लिव्हर खराब होण्यास किती काळ लागतो?
या प्रश्नाचं ठराविक उत्तर देता येत नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर दारूचा परिणाम वेगवेगळा होतो. एखादी व्यक्ती किती प्रमाणात दारू पिते, किती वेळा पिते, तिचं वय किती आहे आणि तिच्या शरीराची रचना कशी आहे, यावर हे अवलंबून असतं. त्यामुळे एका व्यक्तीचं लिव्हर लवकर खराब होऊ शकतं, तर दुसऱ्या व्यक्तीला त्यासाठी जास्त काळ लागू शकतो.
ही लक्षणं दिसताच सावध व्हा
दारूच्या सेवनामुळे लिव्हरवर हळूहळू परिणाम होत जातो. त्यामुळे शरीरात काही बदल दिसू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, असा इशारा डॉक्टर देतात. लिव्हरशी संबंधित कोणतीही लक्षणं जाणवल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. दारूचं सेवन कमी करणं किंवा ते पूर्णपणे थांबवणं, हाच लिव्हरचं आरोग्य जपण्याचा सर्वात सोपा मार्ग मानला जातो.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply