अभिनेत्री श्वेता तिवारी ही केवळ तिच्या व्यावसायिक कामामुळेच नाही, तर खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. कसौटी जिंदगी की या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली आणि प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. मात्र अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यातही अडकली आहे.
हम तुम अँड देममधील सीन
काही वर्षांपूर्वी श्वेताने हम तुम अँड देम या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये ती बॉलिवूड अभिनेता अक्षय ओबेरॉय याच्यासोबत दिसली. सीरिजमध्ये श्वेता आणि अक्षय यांच्यावर एक लिपलॉक सीन चित्रित करण्यात आला होता. श्वेताने दिलेला हा सीन पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
श्वेता आणि अक्षय यांच्या वयात जवळपास पाच वर्षांचा फरक आहे. दोघांमधील या वयाच्या फरकामुळे चित्रित करण्यात आलेला सीन वादाच्या भोवऱ्यात अडकला.
पलकची प्रतिक्रिया आणि ट्रेलरवरून नाराजी
श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी हीदेखील एक अभिनेत्री आहे. ही सीरिज पाहिल्यानंतर पलकला आईचे काम खूप आवडले होते. पलकने तिच्या आईचे भरभरून कौतुक केले होते.
सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा मेकर्सनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यात लिपलॉक सीन ठेवला होता. श्वेताला ही गोष्ट आवडली नव्हती आणि तिने क्रिएटिव्ह टीमवर नाराजी व्यक्त केली होती. श्वेता तिवारीचे हे बोल्ड सीन्स इंटरनेटवर चर्चेत होते. अनेकांनी या अभिनेत्रीचे कौतुक केले होते, तर काहींनी तिला ट्रोलदेखील केले होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा