बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती आणि वेतन घोटाळ्याच्या प्रकरणाने आता निर्णायक वळण घेतले आहे. सेवा समाप्त करण्यात आलेल्या ७३ बोगस शिक्षकांनी उचललेल्या वेतनाच्या वसुलीची जबाबदारी थेट शिक्षणाधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीची शिफारस
अनियमित वैयक्तिक मान्यता दिल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याची शिफारस छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण आयुक्त, पुणे यांच्याकडे केली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
पद मंजूर नसताना भरती?
आदेशानुसार, पद मंजूर नसताना किंवा पद उपलब्ध नसताना भरती करण्यात आल्याचे प्रकरणात समोर आले आहे.
Leave a Reply