नंदुरबार येथील रेल्वे रुग्णालयात वेस्टर्न रेल्वे मजदूर संघ आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिर झाले. डॉ. सी. डी. महाजन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
शिबिरात कोण सहभागी झाले?
या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष किरण पाटील, सचिव पंकज पाठक, कोषाध्यक्ष चेतन बच्छाव, शंकर रंगलानी, प्रोजेक्ट चेअरमन आणि वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे नंदुरबार शाखाध्यक्ष रवींद्र पोतदार, रेल्वेचे सहायक मंडळ अभियंता राधेश्याम मीना, सहायक सिग्नल अभियंता लखनलाल मिणा, सहायक विद्युत अभियंता एन. डी. दोहरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश तबीयाड, वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे सचिव सुनीलकुमार राजोरिया, विनोद लांजेवार, अतुल चौधरी, शरद चौधरी, गौतम बेडसे, दिगंबर देवरे, सचिन रायबोले, समाधान सोनार, राहुल पाटील, रेल्वे पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष विजय बत्तीशे, वासुदेव सोनार, राकेश बत्तीशे, महेश तमाईचेकर आदी उपस्थित होते.
तपासणी आणि मार्गदर्शन
या वेळी डॉ. महाजन यांनी हाडातील ठिसूळतेबाबत आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरात रेल्वे कर्मचारी, त्यांचे नातेवाईक आणि निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची तपासणी आणि औषधोपचार धीरज माळी आणि शुभम दुबे यांनी केले. पंकज पाठक यांनी आभार मानले.
Leave a Reply