मध्य प्रदेशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर चार दिवसांच्या सहलीसाठी चार खास ठिकाणांची माहिती उपयोगी ठरेल. मध्य प्रदेशाला भारताचे हृदय म्हटले जाते. येथे डोंगराळ भाग, ऐतिहासिक इमारती आणि हिरवळ पाहायला मिळते. उज्जैन, महेश्वर, मांडू आणि इंदूर ही चार ठिकाणे या सहलीत नक्की पाहावीत.
उज्जैन आणि महेश्वर
मध्य प्रदेशात फिरायला जात असाल, तर सुरुवात उज्जैनपासून करावी. उज्जैनला मंदिरांचे शहर म्हटले जाते. मध्य प्रदेशात १०० हून अधिक मंदिरे आहेत. या भागात १२ वर्षांनी कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. धार्मिक महत्त्व असलेले हे शहर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी सारखेच आकर्षक आहे.
महेश्वरमधील अहिल्याबाई किल्ला हे आणखी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. या शहरात मराठ्यांच्या इतिहासाची झलक पाहायला मिळते. तसेच या भागात नर्मदा नदीच्या काठी जाऊ शकता. नदीकाठचे शांत वातावरण आणि ऐतिहासिक वारसा यामुळे महेश्वर पर्यटकांना भुरळ घालते.
मांडू आणि इंदूर
मांडू भागात जहाज महाल प्रसिद्ध आहे. या महालात अफगाण आणि मुघल वास्तुकला पाहण्यासारखी आहे. तर या भागातील रस्त्यावरील विकण्यात येणाऱ्या पदार्थांची चव भन्नाट असते. मांडू भागात असलेल्या नीलकंठ महालाला देखील भेट देऊ शकता. त्यानंतर इंदूरला देखील फिरायला जाऊ शकता. चार दिवसांत ही चार ठिकाणे पाहिल्यास मध्य प्रदेशाच्या इतिहास, संस्कृती आणि निसर्गाची चांगली ओळख होईल.
Leave a Reply