राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवाळीचा सण थेट शेतकऱ्याच्या बांधावर साजरा केला. इंदापूर तालुक्यातील शेतकरी हनुमंत लावंड यांच्या घरी जाऊन त्यांनी हनुमंत लावंड यांच्या कुटुंबासोबत दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. एवढेच नाही तर औपचारिकता न बाळगता त्यांनी गोठ्यात जाऊन गायी-शेळ्यांची पाहणी करत पशुधनाची मोठ्या आस्थेने विचारपूस केली.
सरकार मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन
परिसरातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि पंचनाम्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना सरकार मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन भरणे यांनी दिले. तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचे नियोजन
भेटीदरम्यान कृषिमंत्री भरणे यांनी परिसरातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचे नियोजन आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच अल निनोच्या प्रतिकूल प्रभावामुळे शेतीवर ओढवलेल्या संकटाचा उल्लेख करत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. या दुष्काळी संकटात राज्य सरकार बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. तसेच नुकसानभरपाई आणि मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
मी भविष्यामध्ये मिरा देवधर नदीचे पाणी असेल, तसेच पुणे शहर वाढल्याने पाणी कमी पडणार आहे. या बाबतीमध्ये जी तूट निर्माण होणार आहे, या बद्दल मी मिटिंग लावणार आहे. एक आमदार म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रस्ताव मांडले आहेत. सध्या दुष्काळ पडला आहे. पण यातून काय पर्याय काढता येईल या बद्दल प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply