सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनचे फोटो आणि कोडी प्रचंड व्हायरल होत आहेत. पहिल्या नजरेत साधे वाटणारे हे फोटो अत्यंत हुशारीने बनवलेले असतात. असाच एक फोटो सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये फुलपाखरू, ससा आणि माकड लपलेले आहेत. हे तिन्ही प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी लपले असून ते शोधण्याचे आव्हान वाचकांसमोर ठेवण्यात आले आहे.
फोटोमध्ये सुरुवातीला अनेक गोष्टी दिसतात, मात्र बारकाईने पाहिल्यावरच त्यात लपलेले ससा, माकड आणि फुलपाखरू सापडतात. पहिल्या नजरेत हे सहसा सापडत नाहीत, त्यामुळे डोळ्यांची आणि बुद्धीची चांगलीच कसरत होते.
कोडे सोडवण्यासाठी १० मिनिटांचा वेळ
हे कोडे सोडवण्यासाठी वाचकांकडे १० मिनिटांचा कालावधी दिला जातो. फोटोमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे हा अनेकांसाठी आवडीचा आणि मनोरंजक खेळ आहे. वेळेची मर्यादा असल्याने हे आव्हान आणखी रोमांचक बनते.
ऑप्टिकल इल्युजनचे फायदे
चित्रामध्ये लपलेल्या गोष्टी शोधताना डोळे आणि मेंदू अधिक सक्रिय होतात. अशा प्रकारची कोडी सोडवल्यामुळे मेंदूची एकाग्रता आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते, असे मानले जाते. त्यामुळे मनोरंजनाबरोबरच मेंदूचा व्यायामही होतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा