नाश्त्यासाठी रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर सिंधी पद्धतीचा दाल पकवान हा एक चविष्ट पर्याय ठरू शकतो. कुरकुरीत पकवानावर मसालेदार डाळ घालून हा पदार्थ तयार होतो. सिंधी घरांमध्ये हा पदार्थ आवडीने बनवला जातो, मात्र आता इतर घरांमध्येही त्याची लोकप्रियता वाढत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना त्याची चव आवडते. घरात असलेल्या साहित्यातून तो सहज बनवता येतो.
डाळ कशी बनवायची
सर्वप्रथम हरभरा डाळ धुऊन अर्धा तास भिजत ठेवा. नंतर प्रेशर कुकरमध्ये पाणी, हळद आणि मीठ घालून डाळ शिजवा. पाच ते सहा शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. कढईत तेल गरम करून मोहरी तडतडवा. त्यात टोमॅटो घालून शिजवा. टोमॅटो शिजल्यावर गरम मसाला आणि धनेपूड घाला. एक मिनिट परतून झाल्यावर शिजलेली डाळ घाला. चांगले मिसळून दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर शिजवा. यानंतर डाळ तयार होते.
पकवान तयार करण्याची पद्धत
मोठ्या भांड्यात मैदा घ्या. त्यात मीठ, ओवा, तेल आणि कोमट पाणी घालून घट्ट पीठ मळा. हे पीठ अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर त्याचा गोळा करून लाटा. लाटलेल्या पुरीवर काट्याने छिद्रे करा, जेणेकरून तळताना ती फुगणार नाही. कढईत तेल गरम करून या पुर्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. प्लेटमध्ये काढून त्यावर डाळ घाला. वरून चाट मसाला, कांदा आणि लिंबू घालून गरम गरम वाढा.
प्रतिक्रिया व्यक्त करा