रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

घरात नकारात्मक ऊर्जा? वास्तुशास्त्रातील दोन सोपे उपाय

घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्यास आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुदोष कसा ओळखायचा, भीमसेनी कापूर व खडे मिठाचे उपाय कोणते, जाणून घ्या.

घरात नकारात्मक ऊर्जा? वास्तुशास्त्रातील दोन सोपे उपाय

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा अशा काही छोट्या चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. ज्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि ऊर्जा संतुलन बिघडतं. घरातील ऊर्जा संतुलन योग्य नसेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील ऊर्जा संतुलन टिकवून ठेवणं गरजेचं असतं.

वास्तुदोष कसा ओळखायचा?

सगळं सुरळीत सुरू असताना अचानक पैशांच्या समस्या जाणवू लागल्या, काहीही कारण नसताना आरोग्याच्या समस्या जाणवत असतील किंवा घरात अचानक गृहकलह वाढले, पती-पत्नीचं पटत नसेल, तर घरात वास्तुदोष असू शकतो, असं वास्तुशास्त्रात म्हटलं जातं.

दोन सोपे उपाय

पहिला उपाय म्हणजे भीमसेनी कापूर. सायंकाळी देवा समोर दिवा लावताना भीमसेनी कापूरही लावावा आणि हा कापूर देवाला ओवाळल्यानंतर संपूर्ण घरात फिरवावा. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.

दुसरा उपाय म्हणजे खडे मीठ. घरात नकारात्मक ऊर्जेचा त्रास जाणवत असेल तर रात्री झोपताना एका डबीमध्ये थोडं खडे मीठ घेऊन ती डबी आपल्या उशीजवळ ठेवावी. यामुळे नकारात्मक शक्तीचा त्रास होणार नाही, असं सांगितलं जातं.

ही माहिती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आली आहे. याच्या तथ्यांबद्दल कोणताही दावा केला जात नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा दिला जात नाही.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance