बीड-अहिल्यानगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि जीपची समोरासमोर भीषण धडक झाली. बीड तालुक्यातील नेकनूरजवळ हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की कारचे इंजिन वाहनातून बाहेर फेकले जाऊन सुमारे १०० फूट अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ जाऊन पडले. या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.
पाच जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर
या भीषण अपघातात पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
आयपीएस अधिकाऱ्यांनी केली मदत
दरम्यान, बीडकडे जात असलेले आयपीएस अधिकारी वेंकटराम आणि त्यांचे पथक त्याच वेळी त्या मार्गावरून जात होते. त्यांनी घटनास्थळी थांबून जखमींना मदत केली. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर मदत मिळाली.
Leave a Reply