शहरातील सार्वजनिक जागांवर वाढत चाललेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिकेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. सलग चौथ्या दिवशीही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहराच्या विविध परिसरांत धडक मोहीम राबवण्यात आली.
रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यावर भर
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली दुकाने, हातगाड्या तसेच इतर बांधकामांवर कारवाई केली जात आहे.
खाऊ गल्लीवर कारवाईचा फटका
या मोहिमेचा फटका आता पुण्यातील प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील खाऊ गल्लीला बसला आहे. या परिसरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली.
Leave a Reply