गेली सहा दशके हिंदी, मराठी आणि इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने, गायनाने आणि अष्टपैलू कलागुणांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते सचिन पिळगांवकर यांना आता एक मोठा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमुळे आणि कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे त्यांना हा विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. ते आता डॉक्टर बनले आहेत.
आयटीएम विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांना आयटीएम युनिव्हर्सिटी, ग्वाल्हेर यांच्याकडून मानाचा डॉक्टर ऑफ लिट्रेचर (D.Litt. Honoris Causa) हा सन्मान नुकताच देण्यात आला आहे. आयटीएम युनिव्हर्सिटी, ग्वाल्हेरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही सचिन पिळगांवकर यांना डॉक्टर ही पदवी देत असल्याचं समजतं आहे. युनिव्हर्सिटीने २१ नोव्हेंबर रोजी दीक्षांत समारंभात सचिन यांचा सन्मान केल्याचं समजतं आहे.
वैद्यकीय पदवी नसून सन्मान
सचिन पिळगांवकरांना मिळालेली डॉक्टरेट ही वैद्यकीय पदवी नसून त्यांचा सन्मान आहे. हा सन्मान म्हणजे फक्त एका महान कलाकाराचा गौरव नाही, तर सहा दशकांच्या अविरत कलासाधनेचं ते कौतुक आहे. ‘महागुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ कलाकाराला मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Leave a Reply