रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जळगावात राजकीय खळबळ; जैनांच्या जाहिरातीत शिंदेंचा फोटो

माजी मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो झळकल्याने जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

जळगावात राजकीय खळबळ; जैनांच्या जाहिरातीत शिंदेंचा फोटो

जळगावच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आनंद दिघे यांचा फोटो झळकला आहे. ठाकरे गटातून राजीनामा दिल्यानंतर कुठल्याच पक्षात जाणार नाही, असे जैन यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता त्यांच्या जाहिरातींमध्ये शिंदे यांचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

जाहिरातीतील फोटोंमुळे चर्चा रंगल्या

जळगावात माजी मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या होत्या. या जाहिरातींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे आणि आमदारांचे फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या जाहिरातीत शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटात असताना सुरेश जैन यांनी मे २०२४ मध्ये पक्ष सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. ठाकरे गटाचे सदस्यपद सोडल्यानंतर आपण कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचे जैन यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी त्यांनी वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते.

जैन नेमके कोणाचे?

शिवसेना शिंदे गटात नसतानाही जैन यांच्या जाहिरातीत शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो दिसल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, मात्र उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटाच्या नेत्यांचा कुठलाही फोटो नाही. त्यामुळे नेमके पडद्यामागे काय घडत आहे, असा सवाल निर्माण होत आहे.

दरम्यान, जळगाव लोकसभा निवडणुकीत सुरेश जैन यांनी भाजपच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या सदस्यपदाचाही राजीनामा दिला होता. आता जाहिरातींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो आणि लोकसभेत भाजपला दिलेला पाठिंबा यामुळे सुरेश जैन नेमके कुणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो झळकल्याने ही आगामी काळात काही राजकीय समीकरणाची नांदी आहे का, असा देखील प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance