पुण्यात थंडीचा जोर वाढला असून किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. विशेष म्हणजे थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही पुणे अधिक गारठले आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी शहरात तीव्र गारठा जाणवत असून पुढील दोन दिवस अशीच थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर लक्षणीयरीत्या वाढला आहे. किमान तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी पुण्यातील किमान तापमानाचा पारा ११.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात थंडीचा अनुभव येत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार शहरातील किमान तापमान सुमारे ११.३ अंश सेल्सिअसवर आले आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी शहरात कडाक्याची थंडी जाणवत आहे.
पुढील दोन दिवस असाच गारठा
पुणे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस थंडीची हीच तीव्रता कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळ आणि रात्रीच्या वेळी अधिक गारठ्याचा अनुभव येऊ शकतो. थंडीचा जोर वाढल्याने पहाटे बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी उबदार कपडे वापरणे आवश्यक ठरणार आहे.
Leave a Reply