महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून उत्तर महाराष्ट्रात गारठा अधिक जाणवत आहे. धुळे येथे ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर निफाडमध्ये ६.५ अंश आणि जळगावमध्ये ८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. नाशिक आणि यवतमाळमध्ये १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पहाटेची थंडी अधिक
राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे. धुळे, निफाड आणि जळगाव या भागांमध्ये तापमानात मोठी घट झाली असून पहाटेच्या वेळी थंडी अधिक जाणवत आहे. काही ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे.
चक्रीवादळाचा प्रभाव
हवामानातील या बदलामागे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अक्वान’ चक्रीवादळाचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे.
Leave a Reply