सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जलतारा प्रकल्प: शेतात शोषखड्डे करा, भूजल पातळी वाढवा

बीड जिल्ह्यात जलतारा प्रकल्पांतर्गत शेतामध्ये शोषखड्ड्यांची निर्मिती करून भूजल पातळी वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

जलतारा प्रकल्प: शेतात शोषखड्डे करा, भूजल पातळी वाढवा

जलतारा प्रकल्पांतर्गत पाण्याचा योग्य निचरा करून भूजल पातळी वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये शोषखड्ड्यांची निर्मिती करावी, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात चारा लागवड, जलतारा प्रकल्प आणि व्हीबी-जी राम जी योजनेअंतर्गत दुष्काळ निवारण कामांचा आढावा त्यांनी घेतला.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते.

शोषखड्ड्यांमुळे भूजल पातळीत वाढ

जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले, जलतारा प्रकल्पांतर्गत शोषखड्ड्यांचा आकार आणि रचना यामुळे शेतातून वाहून जाणारे पावसाचे पाणी एकत्र होते. खड्ड्यातील खडीच्या थरांमुळे हे पाणी फिल्टर होऊन जमिनीत खोलवर मुरते. त्यामुळे भूजल पातळीत झपाट्याने वाढ होण्यास मदत होते. जॉबकार्डच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक गावात वर्षाला ५० पेक्षा जास्त जलतारा कामे घेण्याची सवलत आहे.

चारा लागवड आणि दुष्काळ निवारण कामांचा आढावा

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य चारा पिके, कमी पाण्यासाठी योग्य असणारे वाण आणि कमी कालावधीत जलद उत्पादन देणाऱ्या पिकांची सविस्तर माहिती जाणून घेत त्यांनी योग्य त्या सूचना केल्या. यावेळी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या घरकुल, विहीर आणि जलतारा प्रकल्पाच्या कामावर कार्यरत असलेल्या मजुरांच्या उपस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना दुष्काळ निवारण विषयक कामे प्राधान्याने हाताळण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance