सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अमित शाह पुण्यात, शिंदे सेनेच्या मंत्र्याचे सूचक वक्तव्य

अमित शाह आज पुण्यात आहेत. अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी विलिनीकरणावर सूचक वक्तव्य केले.

अमित शाह पुण्यात, शिंदे सेनेच्या मंत्र्याचे सूचक वक्तव्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आले आहेत. पुणे जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात त्यांच्या हस्ते महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अन्य नेते उपस्थित राहतील.

दरम्यान, अमित शाह पुण्यात असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

शाह यांच्या भेटीनंतर घडामोडींची चर्चा

अमित शाह जिथे जातात तिथे आपला ठसा उमटवतात. इतिहास पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चित काही घडामोडी घडतील. राजकीय समीकरणे असतील, इतर बाबी असतील. अमित शाह यांच्या भेटीनंतर निश्चित चर्चा होईल, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

विलिनीकरण असेल तर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून त्याची चर्चा सुरू आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, इतर समीकरणे जुळवाजुळवीची चर्चा आहे, म्हणून अमित शाह यांनी वेळ घेतला असेल, असे शिरसाट म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विलिनीकरण होणार की ऑपरेशन टायगर, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाभोवती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा फिरत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार विलिनीकरणाचे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. मात्र, अजूनही ही चर्चा थांबत नाही. शरद पवार रुग्णालयात दाखल होते, तेव्हापासून या सर्व चर्चा सुरू झाल्या. पार्थ पवार स्वतः दोनदा सिल्व्हर ओकवर गेले होते.

मफलर मॅनवरूनही आरोप-प्रत्यारोप

रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात मफलर मॅनचा उल्लेख करत आहेत. हा मफलर मॅन कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवारांचा घात की अपघात, हे प्रकरण निकाली निघाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. तुमच्याकडे माहिती असेल तर ती उघड करा. पोलिसांना सहकार्य करा. पोलीस कायदेशीर सहकार्य करतील, असे शिरसाट म्हणाले.

दुसरीकडे, रोहित पवारांना स्टंटबाजी करायची सवय आहे. मागच्या 10 तारखेला ते पत्रकार परिषद घेणार होते. आता पुन्हा पत्रकार परिषद घेणार म्हणत आहेत. ही स्टंटबाजी आहे, चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance