मालेगाव तालुक्यातील द्याने येथील मोसम नदी पात्रालगत स्मशानभूमीच्या बाजूला रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत लवकरच रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. हे रुग्णालय दलित आणि बहुजन वस्तीलगत आहे. त्यामुळे नूतन रुग्णालयास माता रमाई आंबेडकर रुग्णालय असे नाव द्यावे, अशी मागणी या भागातील प्रशित मंडळ समितीसह नागरिकांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दलित व बहुजन वस्तीलगत नवे रुग्णालय
नवीन रुग्णालयाला लागून फुले नगर, चंद्रमणी नगर, आंबेडकर नगर, गौतम नगर, बहुजन नगर आणि आंबेडकर नगर सर्वे क्रमांक ३३१ या भागात दलित समाजातील नागरिक बहुसंख्येने राहतात. या वस्त्यांच्या शेजारीच नवे रुग्णालय उभे राहत असल्याने त्याला माता रमाई आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन
विकास यशोद, राजू खेडकर, मिलिंद वाघ, अनिल मुंडे, दीपक संसारे, कपिल देवरे, पिनु गांगुर्डे, राकेश शेजवळ, प्रदीप जाधव, सुनील म्हसदे, दीपक शेजवळ, शरद यशोद आणि सिध्दार्थ पवार आदींनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. रुग्णालय लवकरच सुरू होणार असल्याने नावाबाबतचा निर्णय वेळेत घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Leave a Reply