, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

निलेश लंके: डिलिमिटेशनवर अजून निर्णयच घेतलेला नाही

डिलिमिटेशनवर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. बिलाचा अभ्यास करून सर्व खासदार पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन निर्णय जाहीर करू, असे निलेश लंके म्हणाले.

निलेश लंके: डिलिमिटेशनवर अजून निर्णयच घेतलेला नाही

संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणाच्या घडामोडींना वेग आला आहे. एनडीएविरोधात उभ्या राहणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका बदलल्याने केंद्र सरकारचा संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या मुद्द्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे दिसत आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याच्या बाजूने असताना रोहित पवार यांनी त्याला विरोध केला आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी डिलिमिटेशनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

खासदार निलेश लंके म्हणाले, डिलिमिटेशन बिलाबाबतचे मतभेद तर कालपासून जे प्रत्येक विविध माध्यमाद्वारे चालू आहे, तसा काहीच प्रकार नाही. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठले जरी बिल संसदेमध्ये येणार असले, तर आम्ही त्याचा पूर्णपणे अभ्यास करतो. त्याचे बारकावे शोधल्याशिवाय आम्ही निर्णयापर्यंत जात नाही. तर डिलिमिटेशनसारखे महत्त्वाचे बिल ज्यावेळेस येईल, त्यावेळेस आम्ही सगळेजण त्या बिलाचा पूर्णपणे अभ्यास करणार, त्याचे बारकावे शोधणार आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व खासदार पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही बैठक घेऊन पुढला निर्णय जाहीर करू.

इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेले नाहीत?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इंडिया आघाडीच्या बैठकीला आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई नेहमी त्या बैठकीला हजर असतात; पण अचानक पवार साहेबांची तब्येत थोडी खराब झाल्यामुळे ताई हॉस्पिटलच्या कामामुळे जाऊ शकल्या नाहीत आणि ती जबाबदारी नंतर मला दिली, इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्यासाठी सांगितले, पण माझी पूर्वनियोजित तोरणा किल्ल्यावरती मोहीम असल्यामुळे मला पण जाणे शक्य नाही, असे लंके म्हणाले. तरी पण मी मोहीम जर लवकर उरकली तर मी दिल्लीसाठी रवाना होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

१५० कोटींच्या आरोपावर काय म्हणाले?

काँग्रेस आणि शिवसेनेच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना लंके म्हणाले की, काँग्रेस नाराज व्हायचा, शिवसेना नाराज व्हायचा काही संबंध नाही. कारण अजूनही आम्ही कुठला निर्णयच घेतलेला नाही. तुम्ही जर बळंच एखाद्याला एखाद्या कोपऱ्यात, एखाद्या बाजूला ढकलत असाल, तर ते चुकीचे आहे. आम्ही जर अजूनही त्या बिलावर अभ्यास केला नाही, त्या बिलाबाबत आम्ही निर्णयच घेतला नाही, तर तुम्ही असे कुठल्यातरी चुकीच्या पोस्ट करणे योग्य नाही. आता त्यांना काय माहिती असेल मला माहित नाही; पण आमच्या तरी अद्यापपर्यंत असे कुठल्या खासदाराला १५० कोटी रुपये मिळाले, असे काही आमिष दाखवले, असे तरी आमच्या तरी सध्या कोणाच्या कानावर अशा गोष्टी नाहीत, असे लंके म्हणाले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance