वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी जेव्हा रास बदलतो, तेव्हा काही राशींवर शनिची ढैय्या सुरू होते, तर काही राशींवर साडेसाती सुरू होते. काही राशींच्या व्यक्तींना साडेसातीपासून मुक्तीही मिळते. पुढच्या वर्षी तीन जून 2027 रोजी शनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या बदलामुळे दोन राशींच्या जीवनात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कन्या आणि मकर राशीवर ढैय्याचा प्रभाव
तीन जून 2027 रोजी शनी मेष राशीत प्रवेश केल्यानंतर कन्या आणि मकर राशींच्या व्यक्तींवर शनिची ढैय्या सुरू होणार आहे. 2027 ते 2030 या कालावधीत या दोन राशींच्या व्यक्तींनी करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत सतर्क राहण्याची गरज असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. या काळात एकामागोमाग अडचणी येऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
2027 ते 2030: शनिच्या चालीतील बदल
तीन जून 2027 रोजी शनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2027 रोजी शनी वक्री चाल चालून पुन्हा मीन राशीत येणार आहे. त्यामुळे कन्या आणि मकर राशीच्या व्यक्तींना काही काळासाठी ढैय्यापासून सुटका मिळेल.
23 फेब्रुवारी 2028 रोजी शनी मार्गी होऊन पुन्हा मेष राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे कन्या आणि मकर राशींवर पुन्हा ढैय्याचा प्रभाव राहील. आठ ऑगस्ट 2029 रोजी शनी मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दोन राशींना ढैय्यापासून मुक्ती मिळेल.
पाच ऑक्टोबर 2029 रोजी शनी आपली चाल बदलून वक्री अवस्थेमुळे पुन्हा मेष राशीत येणार आहे. त्यामुळे कन्या आणि मकर राशीचे लोक पुन्हा ढैय्याच्या प्रभावात येतील. अखेर 17 एप्रिल 2030 रोजी शनी वृषभ राशीत जाणार आहे. त्यानंतर कन्या आणि मकर राशीच्या व्यक्तींची ढैय्यापासून कायमची मुक्ती होईल, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते.
टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रानुसार सामान्य मार्गदर्शनासाठी दिली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा