, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

फुटीर गटाला न्यायालयाचा धक्का; बॅनर्जींची नियुक्ती रद्द

उच्च न्यायालयाने ऋतुब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती रद्द केली आहे. न्यायालयाने दहा दिवसांत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

फुटीर गटाला न्यायालयाचा धक्का; बॅनर्जींची नियुक्ती रद्द

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. तिथल्या उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसच्या फुटीर गटाला जोरदार धक्का दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी फुटीर गटाचे नेते ऋतुब्रत बॅनर्जी यांना दिलेले विरोधी पक्षनेतेपद न्यायालयाने रद्द केले आहे. या पदावर नव्याने निर्णय घ्यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

वाद नेमका कशावरून सुरू झाला?

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. दुसऱ्या गटाचे नेतृत्त्व ऋतुब्रत बॅनर्जी करत आहेत. बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी ऋतुब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपद दिले होते. या निर्णयाला ममता बॅनर्जी गटातील शोभनदेब चटोपाध्याय यांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने ऋतुब्रत बॅनर्जी यांची नियुक्ती रद्द केली. न्यायालयाचा हा निर्णय फुटीर गटासाठी मोठा झटका मानला जात आहे.

याचिकेत असा दावा करण्यात आला होता की, शोभनदेब चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत अगोदरच निर्णय झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 6 मे 2026 रोजी तृणमूल काँग्रेस पक्षाची बैठक झाली होती. या बैठकीत शोभनदेब चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. या बैठकीत ऋतुब्रत बॅनर्जी यांच्यासह 70 आमदार उपस्थित होते. त्यानंतर 19 मे 2026 रोजी चटोपाध्याय यांच्या नावाचे पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

पुढे काय होणार?

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेस पक्षाने विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात अनेक आमदारांच्या खोट्या सह्या होत्या, असा दावा ऋतुब्रत बॅनर्जी यांनी केला होता. मात्र न्यायालयाने आपला निर्णय देत त्यांची नियुक्ती रद्द केली. विरोधी पक्षनेता कोण असेल, यावर दहा दिवसांत निर्णय घ्यावा, असे निर्देशही न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे येत्या दहा दिवसांत बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद निकाली निघण्याची शक्यता आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance