, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

परिसीमनाला विरोध नाही, पण राज्यांच्या जागा बदलू नका: चव्हाण

परिसीमन विधेयकाला मंजुरी मिळाली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, परिसीमनाला विरोध नाही, पण राज्यांच्या जागा बदलू नयेत, अन्यथा दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होईल.

परिसीमनाला विरोध नाही, पण राज्यांच्या जागा बदलू नका: चव्हाण

परिसीमन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हे विधेयक विशेष अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. यापूर्वी काँग्रेससह विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला होता. यावेळीही काँग्रेसचा विरोध असल्याचे सांगितले जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. परिसीमनाला काँग्रेसचा विरोध नाही, परंतु राज्यांच्या तुलनात्मक जागांची संख्या बदलण्यात येऊ नये, असे चव्हाण म्हणाले.

मागच्या दाराने विधेयक आणल्याचा आरोप

माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, भाजपने अपेक्षेप्रमाणे २९ तारखेला विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन अद्याप स्थगित झालेले नसल्यामुळे दोन दिवसांत नवीन अधिवेशन बोलावता आले. त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन नसून पावसाळी अधिवेशनाचाच पुढील टप्पा आहे. कोणालाही विश्वासात न घेता मागच्या दाराने लपून-छपून परिसीमन विधेयक आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विधेयकातील नेमक्या तरतुदी पाहिल्याशिवाय अंतिम भूमिका घेता येणार नाही, मात्र परिसीमन करायचे असेल तर ते नक्की करा, पण राज्यांच्या तुलनात्मक जागा बदलू नका, जेणेकरून कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही, असे चव्हाण म्हणाले.

महिला आरक्षणावरून सरकारवर हल्ला

महिला आरक्षण आणण्यासाठी परिसीमन करत आहोत, असा दावा सरकार करत आहे. ही ‘बोगसगिरी’ आणि ‘खोटारडेपणा’ असल्याचा हल्ला चव्हाण यांनी चढवला. सरकार थापा मारून भारताच्या जनतेची फसवणूक करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी चव्हाण यांनी परिसीमनाचा ऐतिहासिक संदर्भही दिला. परिसीमन ही मूळ घटनेतील तरतूद असून १९५१, १९६१ आणि १९७१ च्या जनगणनेनंतर परिसीमन झाले होते. प्रत्येक जनगणनेनंतर राज्यांच्या लोकसभेतील जागांची तुलनात्मक संख्या बदलत राहिल्यास दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होईल, हे ओळखून १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या जागांची संख्या २५ वर्षांसाठी गोठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा महाराष्ट्राच्या ४८ आणि उत्तर प्रदेशच्या ८० जागा होत्या. २००१ मध्ये हा कालावधी संपल्यानंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आणखी २५ वर्षांसाठी जागा गोठवण्याचा निर्णय कायम ठेवला, जो आता २०२६ मध्ये पूर्ण होत आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance