पैसा माणसाच्या जगण्यासाठी अत्यावश्यक आहे, हे चाणक्य मान्य करतात. पैसा नसेल तर समाजात मान-सन्मान मिळत नाही, तर पैसा असला की तोच समाज डोक्यावर घेतो. त्यामुळेच प्रत्येकाने कमाईचा काही भाग बाजूला ठेवायलाच हवा, असं चाणक्य सांगतात. महिन्याला शंभर रुपये मिळत असतील, तर त्यातले पंचवीस रुपये तरी वाचवावेत, असं त्यांचं म्हणणं आहे.
मात्र पैसा असणं म्हणजे सगळं काही मिळालं, असं मात्र नाही. पैशाबरोबर काही गुणही माणसाकडे असणं गरजेचं आहे. हे गुण नसतील, तर हातातल्या पैशाची किंमतही शून्यावर येते. अडचणीच्या काळात पैसा मदतीला येतोच, पण कधीकधी पैशापेक्षा माणसांची जास्त गरज भासते. म्हणून समाजाशी नेहमी जोडलेलं राहावं, असा चाणक्यांचा सल्ला आहे.
ज्ञान हेच खरं संरक्षण
चाणक्यांच्या मते, नुसता पैसा असून काहीच उपयोग नाही, जर सोबत ज्ञान नसेल तर. ज्ञान नसेल तर लोक फसवणूक करून तुमच्याकडचा सगळा पैसा काढून घेतील. कितीही पैसा असला तरी ज्ञानाशिवाय त्याचा काहीच उपयोग नाही, असं चाणक्य ठामपणे सांगतात. त्यामुळेच ज्ञान ही माणसाकडे असलेली पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे.
मान-सन्मान आणि माणसांशी नातं
पैसा तर अनेकांकडे असतो, पण समाजात मान-सन्मान फार थोड्यांनाच मिळतो. पैसा असूनही मान-सन्मान नसेल, तर त्या पैशाला फारसा अर्थ उरत नाही. त्याचबरोबर अडचणीत साथ देणारी माणसं हीच खरी संपत्ती आहे. म्हणून पैसा कमवताना ज्ञान मिळवावं, मान-सन्मान जपावा आणि माणसांशी नातं टिकवावं, हीच चाणक्य नीतीची शिकवण आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा