मालिकाविश्वातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघांतली तुटेना’ या मालिकेत काम करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या आवडत्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरबद्दल सांगितले असून, तिचे उत्तर चर्चेत आले आहे.
तेजश्रीने सिने तडका 2.0 ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सूत्रसंचालकाने तिला विचारले की, अलीकडे पाहिलेली एखादी रील तिला खूप आवडली असेल, असा इन्फ्लुएन्सर कोणता आहे? यावर तेजश्रीने सायली राऊत हिचे नाव घेतले.
सायली राऊतच्या अभ्यासाचे कौतुक
सायली राऊत ही आपली आवडती इन्फ्लुएन्सर असल्याचे तेजश्रीने सांगितले. सायलीचे व्हिडिओ पाहायला तिला खूप आवडतात आणि ती ते खूप एन्जॉय करते. सायली जी पात्रे साकारते, त्यांचा ती इतका सखोल अभ्यास करते की एखाद्या अभिनेत्याचाही अभ्यास कमी पडेल, इतकी छान लकब तिने घेतली आहे, असे तेजश्री म्हणाली.
अथर्व सुदामे आणि सुमितचे व्हिडिओही आवडतात
पुरुष इन्फ्लुएन्सरमध्ये कोण आवडतो, हेही तेजश्रीने यावेळी सांगितले. तिला अथर्व सुदामे यांचे व्हिडिओ आवडतात, तसेच सुमितचे व्हिडिओही आवडतात, असे तिने मुलाखतीत म्हटले.
प्रतिक्रिया व्यक्त करा