माजी क्रिकेटपटू झहीर खान यांच्या मेहुण्या शिवजीत घाटगे यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. शिवजीत हे अभिनेत्री सागरिका घाटगे यांचे भाऊ आहेत. या लग्नाला क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
लग्नाच्या कार्यक्रमात झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्यासह माजी क्रिकेटपटू आशीष नेहरा आणि अजित आगरकर हेदेखील दिसले. मैदानावर आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना चकित करणारे खेळाडू या सोहळ्यात मौजमस्ती करताना दिसले.
लग्नात क्रिकेट आणि बॉलिवूडचा संगम
बॉलिवूडपासून क्रिकेटपर्यंत ग्लॅमर आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मंडळी या लग्नाला जमली होती. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सागरिकाने वेधले सर्वांचे लक्ष
या लग्नात सर्वाधिक लक्ष झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी वेधून घेतले. त्यांचे फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा