दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांमधील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एकूण १४ निर्णय घेण्यात आले असून त्यामध्ये दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या निर्णयानुसार प्रत्येक व्यक्तीला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू याप्रमाणे धान्य दिले जाईल. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना हे धान्य मिळणार आहे. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना पुढील तीन महिने धान्याची चिंता राहणार नाही. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत १४ निर्णय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, कामगार आणि आर्थिक फसवणुकीचे बळी यांच्याशी संबंधित निर्णय घेण्यात आले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याबरोबरच इतर विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णयही या बैठकीत मंजूर करण्यात आले. राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी धान्याची मदत मिळणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांपर्यंत हे धान्य पोहोचवण्याची व्यवस्था संबंधित विभागाकडून केली जाणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा