राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि डिजिटल सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना (पॅक्स) ‘आपले सरकार सेवा केंद्र’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
मंत्री आशिष शेलार यांची माहिती
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी हा निर्णय जाहीर केला. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅक्स संस्था यापूर्वीच डिजिटल पेमेंट, विमा नोंदणी, पेन्शन योजना, युटिलिटी बिल संकलन, तिकीट सेवा आणि कृषी सल्ला अशा विविध डिजिटल सेवा देत आहेत.
गावातच सेवा मिळणार
या निर्णयामुळे ग्रामीण नागरिकांना शासकीय आणि डिजिटल सेवा त्यांच्या गावातच मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना सेवांसाठी दूर जावे लागणार नाही.
प्रतिक्रिया व्यक्त करा