शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीचा आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळाचा दाखला देत जोरदार युक्तिवाद केला.
शिंदे आणि फडणवीस यांच्यावर सवाल
अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करताना युतीचा धर्म कुठे होता, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. तसेच अडीच वर्षे महाविकास आघाडी सत्तेत असताना शिंदे यांना काही अडचणी का नव्हत्या, असा धारदार सवालही त्यांनी विचारला.
सुनावणीत पु�दीर काय?
शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणीत सिब्बल यांचा युक्तिवाद महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा