दिवाळीनंतर अनेकजण ज्या दिवसाची वाट पाहतात, तो दिवस म्हणजे देव दिवाळी. वैदिक पंचांगानुसार २४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी साजरी करण्यात येत आहे. हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला अर्थात देव दिवाळीला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
देव दिवाळीचे धार्मिक महत्त्व
या दिवशी भगवान विष्णू, भगवान शिव आणि इतर देवी-देवतांचे पूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी अनेक कुटुंबांमध्ये देव दिवाळीच्या निमित्ताने कुलदेवतेची विशेष पूजा केली जाते.
कुलदेवतेची पूजा का महत्त्वाची
कुलदेवता ही आपल्या कुळाची आराध्य देवता मानली जाते. त्यामुळे तिचे स्मरण आणि पूजन केल्याने कुटुंबावर देवतेची कृपा राहते, अशी धार्मिक मान्यता आहे. देव दिवाळीच्या दिवशी कुलदेवतेची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिले जाते.
Leave a Reply