, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

आईच्या निधनानंतर पंधरा दिवसांतच सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

आईच्या मृत्यूनंतर १५ दिवसांतच नायगावमधील सहा वर्षांच्या मुलावर काळाने घाला घातला. हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी अकराव्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.

आईच्या निधनानंतर पंधरा दिवसांतच सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

नायगाव पूर्वेकडील नवकार टॉवर सोसायटीमध्ये राहणाऱ्या सहा वर्षांच्या मिलीत दिनेशकुमार सुतार या मुलाचा अकराव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते.

## हॉस्टेलला जाण्याची तयारी पूर्ण

आईच्या मायेविना पोरका झालेला हा चिमुरडा नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी बुधवारी महाबळेश्वर येथील हॉस्टेलमध्ये जाणार होता. त्याची बॅगही भरून तयार होती. मात्र, हॉस्टेलला जाण्याच्या आदल्याच दिवशी त्याच्यावर काळाने झडप घातली.

या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, एका पित्याच्या आयुष्यातील दुःखाला पारावार उरलेला नाही.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance