नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात आठवडाभरात जवळपास ९०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दुष्काळानंतर नवे संकट
कमी पाण्यामुळे टँकरने सिंचन करून कांद्याचे पीक जगवावे लागले. त्यामुळे उत्पादन खर्चही वाढला आहे. दुष्काळानंतर दर घसरणीचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
दर घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांनी सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.
Leave a Reply