मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

शक्तिपीठ मॅपिंगला पेरणोली-हरपवडेत विरोध; ६० शेतकरी ताब्यात

शक्तिपीठ मोजणीला पेरणोली-हरपवडे येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; पूर्वसूचनेशिवाय मोजणी सुरू झाल्याने शेतकरी आक्रमक झाले, ६० जणांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.

शक्तिपीठ मॅपिंगला पेरणोली-हरपवडेत विरोध; ६० शेतकरी ताब्यात

आजरा तालुक्यात पोळगाव, खानापूर, एरंडोळ येथे महसूल विभागाने पोलिस फाट्यासह सुरू केलेल्या ‘शक्तिपीठ’च्या अक्षांश-रेखांश मोजणीच्या माध्यमातून माहिती संकलनाला तीव्र विरोध झाल्यानंतर पेरणोली व हरपवडे येथील शेतकऱ्यांनीही तीव्र विरोध केला. सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायला निघाले असल्याची भावना शेतकऱ्यांनी तहसीलदार समीर माने आणि सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी ६० जणांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.

पूर्वसूचनेशिवाय मोजणी सुरू

कोणतीही पूर्वसूचना न देता माहिती संकलन सुरू केल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ‘शक्तिपीठ’ विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा दिल्या. हरपवडे येथील रासुबाईच्या ओढ्यावर सकाळी ९ वाजता ‘शक्तिपीठ’च्या माहिती संकलनासाठी प्रशासन हजर होते. ही माहिती शेतकऱ्यांना मिळताच पेरणोली व हरपवडे येथील शेतकऱ्यांनी धाव घेतली.

रासुबाईच्या ओढ्यावर ठिय्या

यावेळी कॉ. संपत देसाई आणि रामचंद्र हळवणकर यांनी मनोगतातून शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय मांडला. यावेळी कारखाना संचालक हरिबा कांबळे, अमर पवार, सुभाष देसाई, संकेत सावंत, उदय कोडक, धनाजी सावंत, पांडू पाईम, श्रीधर हळवणकर, दत्ता गुरव, निवृत्ती कांबळे, शिवराम गुरव, शंकर तिबिले, विष्णू हळवणकर आदी शेतकरी उपस्थित होते.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance