जकार्ता : वाढती समुद्रपातळी, पूर, हिमनद्यांचे वितळणे किंवा दुष्काळ अशा विविध रूपांत हवामान बदलाचे परिणाम दिसत आहेत. मात्र इंडोनेशियातील दुर्गम गुहांमध्ये हा बदल मिठाच्या स्फटिकांच्या रूपात मोजला जात आहे.
हवामान बदलामुळे मानवी इतिहासातील सर्वात जुनी आणि मौल्यवान शैलचित्रे कायमची नष्ट होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून, ती वाचवण्यासाठी पुरातत्वशास्त्रज्ञांसमोर काळाशी शर्यत लागली आहे. ही चित्रे सुमारे ६७,८०० वर्षे जुनी आहेत.
हॅलोक्लास्टीची प्रक्रिया
शास्त्रज्ञांच्या मते, वाढते तापमान, दीर्घकाळ चालणारा कोरडा हंगाम आणि मान्सूनमधील आर्द्रतेचे बदलते प्रमाण यामुळे गुहांमध्ये हॅलोक्लास्टी नावाची प्रक्रिया वेगाने घडत आहे. या प्रक्रियेमुळे गुहेतील चुनखडीच्या खडकांवर परिणाम होत असून, त्यावर असलेली प्राचीन चित्रे नष्ट होण्याचा धोका वाढला आहे.
Leave a Reply