सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील कारी गावात दुष्काळात द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकरी शेवटची धडपड करत आहेत. जमिनीच्या पोटात पाणी शोधण्यासाठी बोरवेलच्या गाड्यांचा गावोगावी धुरळा उडत आहे. केवळ कारी गावातच गेल्या दीड महिन्यात तब्बल ६०० बोअरवेल घेण्यात आल्याचा अंदाज आहे. पाण्याच्या शोधात शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये जमिनीत घातले आहेत.
लाखोंचा खर्च, पाण्याने साथ सोडली
द्राक्षबाग उभी करण्यासाठी लाखोंचा खर्च येतो. वर्षभर खते, औषधे, मजुरी आणि पाण्यावर खर्च केला जातो. फळधारणा झाली आणि नेमकं त्याचवेळी पाण्याने साथ सोडली. आता डोळ्यांसमोर उभं असलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी पुन्हा कर्ज काढून बोरवेल घेत आहेत.
पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या पिकाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, बोरवेल हाच त्यांच्यासाठी शेवटचा आधार ठरत आहे.
Leave a Reply