सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पालघरमध्ये महायुतीत ठिणगी: व्यासपीठावरच खडाजंगी

पालघरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्यात व्यासपीठावरच जोरदार खडाजंगी झाली.

पालघरमध्ये महायुतीत ठिणगी: व्यासपीठावरच खडाजंगी

पालघरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्यात व्यासपीठावरच खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादाचा आवाज नसलेला व्हिडिओही समोर आला असून, पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केल्याचे दिसत आहे.

हा भाजपचा कार्यक्रम असताना तुम्ही व्यासपीठावर का आलात, असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी केल्याचे आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितले. तर पालकमंत्री आणि खासदारांनी निमंत्रण दिल्यामुळे आपण कार्यक्रमाला आल्याचे उत्तर दिल्याचे गावित म्हणाले.

रिलीफ हॉस्पिटल प्रकरणावरूनही आरोप

रिलीफ हॉस्पिटल कर्मचारी मारहाण प्रकरणातही गावित यांनी भरत रजपूत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संबंधित डॉक्टरांशी रजपूत यांनी १८ वेळा संपर्क साधल्याचा दावा गावित यांनी केला आहे. या प्रकरणात आपल्या मुलाला गुंतवण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे.

या विषयावर आमदार गावित यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत, असेही समोर आले आहे.

महायुतीतील कलह पुन्हा समोर

या घटनेमुळे पालघरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील महायुतीचा अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये महायुतीत सगळे काही ठिक असल्याचे चित्र दिसत नसून अंतर्गत कलह सातत्याने समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या घटनेनंतर गावित यांनी केलेल्या आरोपांवर रजपूत काय प्रत्युत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance