केंद्रातील सरकार लवकरच संसदेत परिसीमन विधेयक सादर करण्याच्या तयारीत असतानाच आंध्र प्रदेशातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच एनडीएच्या दोन प्रमुख घटक पक्षांनी परस्परविरोधी भूमिका घेतली आहे.
दोन नेत्यांच्या दोन भूमिका
मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना गावपातळीवर सर्वांसोबत युती करून आणि एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास सांगितले आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
दोन्ही पक्षांच्या या वेगवेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेलगू देसम पार्टीची भूमिका स्पष्ट करताना चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले आहे की, आता पंचायतींच्या विकासावर लक्ष देण्याची वेळ आली आहे आणि राजकीय स्पर्धा संपली आहे. या निवडणुका सर्वसंमतीने लढवल्या जाव्यात, अशी त्यांची भूमिका आहे.
पुढे काय होणार?
दुसरीकडे पवन कल्याण यांनी ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात राजकारण तापण्याची शक्यता आहे. या दोन्ही घटक पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांचा केंद्र किंवा राज्य पातळीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे म्हटले जात आहे. मात्र आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply