पश्चिम बंगालच्या भाजप आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.
विषबाधा झाल्याचा अहवाल
वैद्यकीय-कायदेशीर अहवालानुसार रेखा पात्रा यांच्या शरीरात ऑर्गनोफॉस्फोरस-आधारित कीटकनाशकाची विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. संशयास्पद विषबाधेमुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्यमंत्र्यांची रुग्णालयात धाव
प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रेखा पात्रा यांच्या उपचारांवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
Leave a Reply