रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अजितदादा गेल्यापासून घड्याळ मागे-पुढे; झिरवाळांचे वक्तव्य

अजित पवार असताना घड्याळ एक मिनिटही मागे-पुढे होत नव्हते, आता ते थोडे मागे-पुढे होत आहे, असे नरहरी झिरवाळ म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी वक्तव्य केले.

अजितदादा गेल्यापासून घड्याळ मागे-पुढे; झिरवाळांचे वक्तव्य

अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडे मागे-पुढे होत असल्याचे वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. अजित पवार असताना घड्याळ एक मिनिटही मागे-पुढे होत नव्हते, असेही ते म्हणाले. आता घड्याळ थोडे मागे-पुढे होत असले तरी ते व्यवस्थित असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाचा नेमका राजकीय अर्थ काय, याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. ते नांदेड जिल्ह्यातील वाळकेवाडी येथे माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार की नाही, याबाबत राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीनंतर चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. अशातच मंत्री झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची मोठी आर्थिक कसरत

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेण्यात आले. या वेळी वाळकेवाडी येथे बोलताना लाडकी बहीण योजना आणि संभाव्य दुष्काळाची चाहूल यामुळे सरकारची मोठी आर्थिक कसरत सुरू असल्याची कबुली खुद्द नरहरी झिरवाळ यांनी दिली. १९७२ मध्ये अन्नाचा दुष्काळ होता, मात्र आज अन्नाची टंचाई नाही. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे किंवा विमानाने पाणी पोहोचवण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागल्यास मोठा निधी लागेल. त्यामुळे यंदा तसेच पुढच्या वर्षीही काहीशी आर्थिक चणचण भासू शकते, असे मत झिरवाळ यांनी मांडले. मात्र या संकटकाळात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय

लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांना १५०० रुपये दिले जातात. या योजनेबाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था झाली असल्याची कबुली मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. या योजनेमुळे सध्या सरकारची कसरत सुरू असल्याचे झिरवाळ म्हणाले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance