राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचे सर्वोच्च केंद्र असलेल्या मंत्रालयातील कामकाज आगामी काळात ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेतनश्रेणी सुधारणा आणि पदनाम बदलाच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मंत्रालयीन लिपिक संवर्गाने केला आहे.
१८ नोव्हेंबरला आरसा गेटवर आंदोलन
संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी १८ नोव्हेंबर रोजी मंत्रालयातील आरसा गेटवर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून लिपिकांनी आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
२५ नोव्हेंबरपासून कामबंदाचा इशारा
शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २५ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा लिपिक संघटनेने दिला आहे. त्यामुळे त्या दिवसापासून राज्याचा कारभार ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply