मुंबईहून उत्तर प्रदेशातील वाराणसीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई ते वाराणसीदरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रवासाचा वेळ किती वाचणार?
ही सेवा सुरू झाल्यास सध्या २४ ते ३० तासांचा असलेला रेल्वे प्रवास अवघ्या १६ ते १८ तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे तब्बल ८ ते १२ तास वाचू शकतात. मात्र, या प्रस्तावाला अद्याप रेल्वे मंत्रालयाची अधिकृत मंजुरी मिळालेली नाही.
मागणी कोणी केली?
वाराणसीतील पिंडरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अवधेश सिंह यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मुंबई-वाराणसी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे.
Leave a Reply