हुवावेने जगातील पहिला नॉन-फोल्डेबल वाइड स्क्रीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन ओएसटीए ओ१ प्रो या नावाने लाँच करण्यात आला आहे. या फोनची प्री-ऑर्डर चीनमध्ये सुरू झाली आहे. फोनच्या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशिओ १६:९.५ आहे. या नव्या फोनमुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांची चिंता वाढली असल्याचे सांगितले जात आहे.
किंमत आणि व्हेरिअंट
हा स्मार्टफोन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज, १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज तसेच १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज अशा चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. १२ जीबी आणि २५६ जीबी व्हेरिअंटची किंमत ५,४९९ युआन म्हणजेच सुमारे ७६,५०० रुपये आहे. १२ जीबी आणि ५१२ जीबी व्हेरिअंटची किंमत ६,४९९ युआन म्हणजेच सुमारे ९०,३३० रुपये आहे.
१६ जीबी आणि ५१२ जीबी व्हेरिअंटची किंमत ७,२९९ युआन म्हणजेच सुमारे १,०१,४५८ रुपये आहे, तर टॉप व्हेरिअंट १६ जीबी आणि १ टीबीची किंमत ८,७९९ युआन म्हणजेच सुमारे १,२२,३०९ रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या कंपनी या फोनच्या सर्व व्हेरिअंटवर २०० युआन म्हणजेच सुमारे २,७८० रुपयांचे डिस्काऊंट देत आहे.
स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
या फोनमध्ये ६.३९ इंचांचा १.५के एलटीपीएस फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन स्टारी ब्लॅक, नेब्युला व्हाइट आणि स्टारबर्स्ट पर्पल या तीन रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये हॉरिजन्टल ड्युअल कॅमेरा मॉड्यूल आणि मागील बाजूला ओएसटीएचा लोगो देण्यात आला आहे.
हा फोन किरिन ९०३०एस चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूला २०० मेगापिक्सेलचा १/१.२८ इंच आरवायवायबी प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासोबत ५० मेगापिक्सेलचा ३.७x आरवायवायबी पेरिस्कोप टेलिफोटो आणि रेड मेपल लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये ६६ वॉट वायर्ड चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह ७,००० एमएएच बॅटरी दिली आहे.
हा फोन हार्मनीओएस ७ एआय पायोनियर एडिशनवर आधारित आहे. हुवावे या फोनला ‘हार्मनीओएस एआय फोन’ असे संबोधते. यामध्ये सिस्टिम स्तरावर एआय वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या फोनचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, चिप आणि क्लाउड घटक यांच्यात उत्तम समन्वय साधला जाईल, अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली आहे.
Leave a Reply