गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सोनिया गांधींचे पुस्तक फाडल्यावर काँग्रेस आक्रमक

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्यावर काँग्रेस आक्रमक झाली. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी शिंदेसेनेला पुस्तक वाचून मग चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.

सोनिया गांधींचे पुस्तक फाडल्यावर काँग्रेस आक्रमक

सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला असून शिंदेसेनेने पुस्तकाच्या प्रती फाडल्या आहेत. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याचा दावा शिंदेसेनेने केला आहे. यामुळे पत्रकार परिषद घेत त्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्या आहेत.

सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ या पुस्तकाला जोरदार प्रतिसाद मिळत असून सर्वत्र या पुस्तकाची चर्चा आहे. मात्र यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याचा दावा करत या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इतिहास कोणी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

## सपकाळ यांची शिंदेसेनेवर टीका

माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सूर्यावर थुंकल्यावर ती थुंकी आपल्याच अंगावर पडते. इतिहास कोणी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही. ही गद्दार गँग जी आहे, त्यांनी शिंदे सेनेच्या माध्यमातून राजकारणाचं विकृतीकरण केलय. त्यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा महाराष्ट्राला दिली आहे.

पुढे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ही शिंदे शिवसेनेची मानसिक दिवाळखोरी आहे. ही संस्कृती नव्हतीच, विकृती होती. विकृतीचा टेंभा ते मिरवतायत. या लोकांकडून संस्कृतपणाची अपेक्षा करणे हेच व्यर्थ आहे. सोनिया गांधी यांनी एक आठवणीचा ठेवा देशासोबत शेअर केलाय. पुस्तकाचा खप प्रचंड होतोय. वर्ल्ड रेकॉर्ड होतोय. या पुस्तकाला फाडणं म्हणजे सूर्यावर पडदा टाकण्यासारखं आहे.

## पुस्तक आधी वाचा, मग चर्चा करा

हर्षवर्धन सपकाळ हे शिंदेसेनेला आव्हान देत म्हणाले की, मला त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. एकदा त्यांनी ते पुस्तक वाचावं. त्यानंतर त्यावर चर्चा करावी, वाद-प्रतिवाद करावेत. त्यांना इंग्रजी येत नसेल. सभ्यता, संस्कृती समजून घ्यायची नसेल, हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो.

शिंदे शिवसेनेमध्ये एवढी हिम्मत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे शिवसेने विरोधात जे निर्णय घेतले, त्या निर्णयाचे जीआर फाडून दाखवावेत, असे थेट आव्हान सपकाळांनी दिले आहे. या वादावर आता दोन्ही पक्षांकडून आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance