सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात नवा घडामोडींना वेग आला आहे. अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने केलेल्या एकजुटीमुळे भाजपला सत्तेच्या सर्वोच्च पदांपासून दूर राहावे लागले आहे.
उदयसिंह उंडाळकर अध्यक्षपदी
या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या एकजुटीने सत्तेचे समीकरण बदलले. उदयसिंह उंडाळकर यांची अध्यक्षपदी निवड झाली असून, भाजपला महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यात यश आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सत्तासंघर्ष अधिक चर्चेत आला आहे.
जयकुमार गोरेंचा इशारा
या घडामोडीनंतर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी इशारा दिला आहे. ‘आगे आगे देखो, होता है क्या…’ असे म्हणत त्यांनी पुढील घडामोडींकडे लक्ष वेधले. गोरे यांच्या आधीच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय घटनाक्रम अधिक महत्त्वाचा ठरतो. आगामी काळात सातारा जिल्ह्यातील राजकारण कोणत्या दिशेने जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply