मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

गौरव रावने पटकावले वर्ल्ड मास्टर्स टेनिसचे विजेतेपद

नांदेडमधील वर्ल्ड मास्टर्स टेनिस स्पर्धेत गौरव रावने ३० वर्षांवरील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्याने मोहित सोरडेचा ६-१, ६-२ असा पराभव केला.

गौरव रावने पटकावले वर्ल्ड मास्टर्स टेनिसचे विजेतेपद

नांदेड डिस्ट्रिक्ट अँड सिटी लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित कोहिनूर-एनईएस एमटी-२०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ३० वर्षांवरील पुरुष एकेरीचे विजेतेपद गौरव राव याने पटकावले. ही स्पर्धा आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात आली आहे. एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत देशभरातील अनुभवी टेनिसपटूंनी सहभाग घेतला आहे.

अंतिम सामन्यात गौरव रावचे वर्चस्व

३० वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात दुसरा मानांकित गौरव राव याने अव्वल मानांकित मोहित सोरडे याचा ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गौरवने सामन्यावर वर्चस्व राखले. मोहितला आपल्या खेळात सातत्य राखता न आल्याने गौरवने सहज विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले.

इतर गटांतील निकाल

३० वर्षांवरील महिला गटाच्या उपांत्य फेरीत रेखा होळंबे हिने कल्पना खानापुरे हिच्यावर ६-०, ६-१ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तृप्ती होळंबे हिने पुढे चाल मिळवत अंतिम फेरी गाठली. ३५ वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत शशांक बोमनाळे याने विनीत तेहरा याचा ६-४, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ४० वर्षांवरील पुरुष गटात बिगरमानांकित गणेश देवखिळे याने अव्वल मानांकित राम कुमार चौधरी याला ६-२, ७-५ असे नमवत स्पर्धेत मोठा धक्का दिला. याच गटात दुसरा मानांकित जयनारायण केआर याने लक्ष्मीनिवास कलंत्रीचा ६-१, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. ४५ वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित स्वरणदीप सिंग धोडी याने नीलेश चांडकचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर पराग अत्रे यांना पुढे चाल मिळाल्याने त्यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे या गटातील अंतिम सामन्याकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance