मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: जयश्री पाटील बिनविरोध विजयी

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जयश्री पाटील बिनविरोध निवडून आल्या आहेत.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: जयश्री पाटील बिनविरोध विजयी

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. या निवडणुकीत भाजपला 10, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळतील असा दावा केला जात आहे. अशातच अर्ज माघारी घेण्याच्या एक दिवस आधीच जळगावच्या जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे.

## जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. अमळनेर तालुक्यातील मनव विकास सोसायटी मतदारसंघातून जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे प्रफुल्ल पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जयश्री पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जयश्री पाटील यांच्यासाठी भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. महायुतीमध्ये अद्याप देखील जागांचा तिढा असून निवडणुकीत महायुतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

## आतापर्यंत चार जागा बिनविरोध

जिल्हा बँकेत आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या दोन, भाजपची एक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक अशा चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. उद्या माघारीचा अंतिम दिवस असून आणखी कोणाची माघार होते याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचाही बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जामनेर तालुका विकास सोसायटीमधून उभे असलेले विरोधक रघुनाथ सखाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव फेटाळल्यामुळे भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांचा बिनविरोध येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance